सीमेवरील जवान उतरला कोरोनाविरुद्धच्या लढ्यात !

सीमेवरील जवान उतरला कोरोनाविरुद्धच्या लढ्यात !
Summary

श्री. काळे हे बडोदा येथे भारतीय सैन्य दलात सुभेदार पदावर कार्यरत आहेत. गेल्या 19 वर्षांपासून ते भारतमातेची सेवा करत आहेत.

पंढरपूर (सोलापूर) : भारतीय सैन्य दलात (Indian Army) सुभेदार म्हणून कार्यरत असलेले हणमंत काळे (Hanmant Kale) यांनी देशसेवेबरोबर कोरोना (Corona) महामारीच्या संकट काळात खरसोळी (ता. पंढरपूर) गावात कोरोनाविरुद्धच्या लढ्यात उतरले आहेत. गावात कोरोनाचा (Corona) फैलाव वाढल्याची माहिती मिळताच 15 दिवसांची सुट्टी घेऊन ते गावकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. येथील दोन हजार ग्रामस्थांना सॅनिटायझर, मास्क आणि अर्सेनिक अल्बम (Arsenic album) गोळ्यांचे मोफत वाटप केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे व गावावर असलेल्या प्रेमाचे पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी त्यांची भेट घेऊन कौतुक केले. (Hanmant Kale of the Indian Army in Pandharpur has come to help in the fight against Corona)

सीमेवरील जवान उतरला कोरोनाविरुद्धच्या लढ्यात !
जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची दीड लाखांकडे वाटचाल !

श्री. काळे हे बडोदा येथे भारतीय सैन्य दलात सुभेदार पदावर कार्यरत आहेत. गेल्या 19 वर्षांपासून ते भारतमातेची सेवा करत आहेत. नेहमीच गावाबद्दल प्रेम असलेल्या सुभेदार काळे यांना आपल्या गावात कोरोनाची साथ झपाट्याने वाढत असल्याची माहिती मित्रांनी दिली. त्यानंतर त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे 15 दिवस सुट्टीची मागणी केली. अधिकाऱ्यांनीही कोरोना संकट काळात आपला जवान मदतीसाठी धावून जात असल्याने तत्काळ सुट्टी मंजूर केली.

गावात आल्यानंतर त्यांनी पहिल्याच दिवशी संपूर्ण गावात निर्जंतुकीकरणाची फवारणी केली. गावात प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. ग्रामस्थांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी अर्सेनिक अल्बम गोळ्यांचेही वाटप केले. गेल्या आठ दिवसांपासून त्यांचा गावात कोरोना विरुद्धचा लढा सुरू आहे. त्यांच्या या लढ्याला आता काही प्रमाणात यश देखील आले आहे.

सीमेवरील जवान उतरला कोरोनाविरुद्धच्या लढ्यात !
पंढरपूर तालुका होतोय हॉटस्पॉट ! जिल्ह्यात आज आढळले 1479 रुग्ण; 24 जणांचा मृत्यू

त्यांच्या उपक्रमाला माजी सरपंच दिंगबर कांबळे, मोहन काळे, विकास पवार, विजय पाटील, अमर पवार यांना साथ दिली आहे. सैनिक हणमंत काळे यांच्या कार्याची माहिती मिळाल्यानंतर पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी प्रत्यक्ष खरसोळी येथे भेट देऊन त्यांचे कौतुक देखील केले.

रुग्णसंख्या झाली कमी

खरसोळी गावात दुसऱ्या लाटेत 124 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 45 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी गावात कोरोना चाचणी कॅम्प घेतला. 30 जणांमध्ये पाच नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तुलनेने हे प्रमाण कमी झाले आहे. ग्रामस्थांमध्ये त्यांनी कोरोना संसर्गाची जनजागृती केल्यामुळे कोरोना संसर्ग कमी झाल्याचे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य छगन पवार यांनी सांगितले.

(Hanmant Kale of the Indian Army in Pandharpur has come to help in the fight against Corona)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com