पदभार घेण्यापूर्वीच कराळेंची बदली! सोलापूरच्या पोलिस आयुक्‍तपदी बैजल

पुढील आठवड्यात ते पदभार घेतील, अशी आशा
Police
Police esakal
Updated on
Summary

पुढील आठवड्यात ते पदभार घेतील, अशी आशा आहे.

सोलापूर: शहराचे पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांना मुंबईतील सुधार सेवा याठिकाणी विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. दुसरीकडे ठाण्याचे अप्पर पोलिस आयुक्‍त दत्तात्रय कराळे यांना सोलापूरचे पोलिस आयुक्‍त म्हणून पदोन्नती मिळाली. मात्र, पदभार घेण्यापूर्वीच त्यांची गृह विभागाने त्यांची बदली रद्द केली. त्यामुळे आता सायबरचे पोलिस उपमहानिरीक्षक हरीश बैजल यांची त्याठिकाणी बदली झाली. पुढील आठवड्यात ते पदभार घेतील, अशी आशा आहे.

Police
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही कार्यवाही नाहीच

गणेशोत्सवामुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊनही त्यांना कार्यमुक्‍त केले नसल्याचे सांगणाऱ्या गृह विभागाने शुक्रवारी (ता. 8) दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. अप्पर पोलिस आयुक्‍त रामनाथ पोफळे व हरीश बैजल यांचा त्यात समावेश आहे. काही दिवसांपूर्वी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोलापूर दौरा केला. त्यावेळी काही दिवसांत सोलापूरचे नवे पोलिस आयुक्‍त रूजू होतील, अशी ग्वाही दिली होती. परंतु, त्याचवेळी त्यांनी कराळे की अन्य कोणी, याबद्दल स्पष्टीकरण दिले नव्हते. बैजल यांनी यापू्र्वी दक्षता विभागाचे सहआयुक्‍त म्हणूनही काम केले आहे. 2016 मध्ये चिंचोली एमआयडीसीतील एव्हॉन कंपनीत सापडलेल्या इफेड्रिन प्रकरणी 'एफडीए'तील सात अधिकाऱ्यांवरील कारवाईचा प्रस्ताव दिला होता. त्यांनी गोंदियाचे पोलिस अधीक्षक म्हणूनही काम केले आहे.

Police
सोलापूर-विजयपूर बायपास नोव्हेंबरपासून सुरु होणार

बदली झाली, पण कार्यमुक्‍त नाहीच

सोलापूर शहराचे नवे पोलिस आयुक्‍त म्हणून दत्तात्रय कराळे यांना पदोन्नती मिळाल्याचे आदेश गृह विभागाने 23 ऑगस्ट रोजी काढले. मात्र, कराळे यांची बदली रद्द झाल्यानंतर सायबरचे पोलिस उपमहानिरीक्षक हरीश बैजल यांच्याकडे सोलापूर शहराचे पोलिस आयुक्‍तपद सोपविण्यात आले. मात्र, अजूनपर्यंत त्यांना पहिल्या पदावरून कार्यमुक्‍त केले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे ते पोलिस आयुक्‍तपदाचा पदभार कधी स्वीकारतील, हे निश्‍चित नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com