esakal | सोलापूर-विजयपूर बायपास नोव्हेंबरपासून सुरु होणार! 15 मिनिटात पोहचणार हत्तूरला
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर-विजयपूर बायपास नोव्हेंबरपासून सुरु होणार
अवघ्या 15 मिनिटात हत्तूर याठिकाणी पोहचता येणार

सोलापूर-विजयपूर बायपास नोव्हेंबरपासून सुरु होणार

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: शहरातून जाणारी जडवाहतूक कमी करून वाहतूक सुरळीत करण्याच्या हेतूने शहराजवळील केगाव (शिवाजी नगरजवळून) येथून हत्तूरपर्यंतचा विजयपूर बायपास रोड आता अंतिम टप्प्यात आला आहे. 15 नाव्हेंबरपर्यंत संपूर्ण काम पूर्ण केले जाणार असून त्यानंतर तेथून वाहतूक सुरु केली जाणार आहे. त्यामुळे अवघ्या 15 मिनिटात हत्तूर याठिकाणी पोहचता येणार आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही कार्यवाही नाहीच

रस्ते अपघातात दरवर्षी राज्यातील सुमारे 30 हजार व्यक्‍तींचा मृत्यू होतो. सर्वाधिक अपघात अन्‌ मृत्यू होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सोलापूर टॉप टेनमध्ये आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये त्याचे प्रमाण अधिक आहे. शहरात सर्वाधिक अपघात जड वाहतुकीमुळेच झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक कोंडी व अपघात कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यासाठी या बायपासचे काम हाती घेण्यात आले होते. नोव्हेंबर 2018 पासून काम सुरु झाले असून त्यासाठी तब्बल चारशे कोटींचा खर्च करण्यात आला आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शिवाजीनगर जवळून हा बायपास हत्तूर याठिकाणी विजयपूर महामार्गाला जोडण्यात आला आहे. मुंबई, पुण्यासह अन्य ठिकाणांवरील जडवाहने आता बायपासवरून जाऊ शकणार आहेत. आता सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

हेही वाचा: कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 'डीबीटी'द्वारे मिळणार 50 हजार

सोलापूर- विजयपूर बायपासचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याच्यादृष्टीने नियोजन सुरु असून काम झाल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

- संजय कदम, संचालक, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, सोलापूर

बायपासमुळे वाहतूक कोंडी होईल दूर

- सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शिवाजीनगरजवळून हत्तूरपर्यंत झाला विजयपूर बायपास

- नोव्हेंबर 2018 पासून कामाला सुरवात; 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत बायपासचे काम पूर्ण होणार

- चारशे कोटींचा खर्च करून पूर्ण केला चौपदरी बायपास; 21 किलोमीटरचा आहे बायपास

- शहरातील जड वाहतूक कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास निश्‍चितपणे मदत होणार

loading image
go to top