लॉकडाउनच्या बेरोजगारीत अनेक रोजगार शोधणारा अवलिया

avliya.jpg
avliya.jpg
Updated on

सोलापूर: कोरोना... लॉकडाउन... संचारबंदी... उद्योग-व्यवसाय बंद... बाजारपेठा बंद... वाढती बेरोजगारी... कोरोना संपणार की नाही... तोपर्यंत काय करायचे व कसे जगायचे..? असे विचार अनेकांच्या मनात सध्या सतावत आहेत. मात्र लॉकडाउनच्या काळात व्यवसाय बंद राहिल्याने नाउमेद न होता, काहीतरी करायचेच, या विचाराने पूर्वभागातील एका हॉटेल व्यावसायिकाने रोजगाराचे अनेक पर्याय शोधले व नोकरी- व्यवसाय हातून गेलेल्या तरुणांसमोर जिद्द असेल तर काहीही करता येते याचा वस्तुपाठ घालून दिला. 

चंद्रकांत द्यावनपल्ली हे अक्कलकोट रोड गांधीनगर येथील गोंधळी वस्ती चौकात स्वत:चे हॉटेल चालवतात. हॉटेलातील खाद्यपदार्थांसाठी लागणाऱ्या भाजीपाल्याच्या खरेदीमुळे भाज्यांचे लिलाव, भाज्यांची खरेदी-विक्री याचा चांगला अनुभव त्यांना आहे. परंतु, 22 मार्चपासून लॉकडाउन सुरू झाले अन्‌ त्यांचे हॉटेल बंद झाले. लॉकडाउन संपेल म्हणून ते वाट पाहत होते. मात्र लॉकडाउन 14 एप्रिलपर्यंत वाढले. मग त्यांच्या मनात चलबिचल सुरू झाली. लॉकडाउन इतक्‍यात हटणार नाही, हे जाणून त्यांनी इतर काहीतरी व्यवसाय करण्याचा विचार केला. चंद्रकांत यांनी 15 एप्रिलला भल्या पहाटे मार्केट यार्डातुन भाजी आणत त्यांच्या हॉटेलाच्या कट्ट्यावरच बसून भाजी विक्री सुरु केली. दरम्यान, दिवसेंदिवस मार्केट यार्डातील एजंट, शेतकरी व भाजी विक्रेत्यांशी ओळखी वाढवत चंद्रकांत यांनी शेतकऱ्यांच्या थेट शेतातून भाजी व फळे खरेदी करावयास सुरवात केली. 

चंद्रकांत यांनी भाजीपाल्याबरोबरच कलिंगड, आंबे, संत्री, मोसंबी आदी फळांसह तिखटासाठी लाल मिरच्या व चिंचही आपल्या स्टॉलवर ठेवत आहेत. एक पोते चिंचोका घेतल्या व भट्टीत भाजून, पॅकिंग करून किराणा दुकानदारांना विकायला सुरवात केली. भुईमुगाच्या शेंगा आणल्या व शेंगा चटणी करून त्याची व शेंगाच्या टरफलाचीही विक्री सुरू केली. आता त्यांचे छोटखानी स्टॉलचे रूपांतर मोठ्या व्यवसायात होत असल्याचे दिसून येते. 

रोजगाराच्या अनेक संधी सापडल्या 
हॉटेल व्यवसाय करताना इतर व्यवसायाकडे कधी लक्ष दिले नाही. मात्र लॉकडाउनमुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे दिसून आले. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या, बेरोजगार झालेल्या स्थानिक युवकांना रोजगाराच्या अनेक संधी आहेत. मात्र जिद्दीने व्यवसाय करण्याचे ध्येय ठेवल्यास कुठलीच व्यक्ती बेरोजगार राहणार नाही. आता मी हॉटेल सुरू झाल्यानंतरही भाजी विक्रीचा व्यवसाय सोडणार नाही. 
- चंद्रकांत द्यावनपल्ली 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur Police Raid on MD Drugs
Mumbai-Mantralay
A total of 1,667 beneficiaries availed government schemes and services at the Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Samadhan Camp in Mohol, where 17 departments offered citizen-centric services under one roof.
BJP workers staged a road blockade and burnt an effigy of Shiv Sena MP Sanjay Raut in Sangola, protesting his remarks against Minister Jaykumar Gore.
Marathi News Esakal
www.esakal.com