Solapur : प्रसिद्धीच्या झोकातील सांगोल्यातील आरोग्य विभाग कोमात

आरोग्य विभागाच्या कारभारालाच 'कर्तव्यतत्परते'चा आणि जबाबदारीचा 'स्टेथस्कोप' लावण्याची गरज
Health department Sangola comatose limelight
Health department Sangola comatose limelight sakal
Summary

आरोग्य विभागाच्या कारभारालाच 'कर्तव्यतत्परते'चा आणि जबाबदारीचा 'स्टेथस्कोप' लावण्याची गरज

सांगोला : आमदार शहाजी बापू पाटील यांच्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सांगोला तालुक्यात आरोग्य विभाग मात्र सध्या कोमात असल्याचे दिसून येत आहे. जुनोनी येथे सोमवारी रोजी झालेल्या अपघातामधील जखमी वारकऱ्यांना तातडीने न मिळालेल्या आरोग्याच्या सुविधा, वैद्यकीय अधीक्षक यांच्या ऐनवेळी दवाखान्यात उशिरा पोहोचणे आदी बाबीवरून या तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कारभारालाच 'कर्तव्यतत्परते'चा आणि जबाबदारीचा 'स्टेथस्कोप' लावण्याची गरज आहे.

सांगोला तालुक्यातील जुनोनीजवळ वारकऱ्यांच्या पायी दिंडीत कार घुसल्याने सातजण ठार तर पाच जण जखमी झाले होते. जुनोनीतून जखमींना सांगोल्यात उपचारासाठी आणले. चार गंभीर जखमींना पुढे उपचारासाठी पाठविण्यात आले. गंभीर घटनेची माहिती समजतात पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. परंतु वैद्यकीय अधीक्षक दवाखान्यात तासाभरानंतर हजर झाले.

वैद्यकीय अधीक्षक उशिरा आल्याने दवाखान्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या अगोदरही झालेल्या आमसभेमध्ये आरोग्य विभागाविषयी अनेक तक्रारी नागरिकांनी उपस्थित केल्या होत्या. आमदार शहाजीबापूंमुळे प्रसिद्धीच्या झोकात आलेला सांगोला तालुक्यातील आरोग्य विभाग मात्र सध्या कोमात असल्याचे दिसून येत आहे.

आरोग्य विभाग सर्वात महत्त्वाचा मानला. शासन आरोग्य विभागावर मोठ्या प्रमाणात खर्च करीत असून सामान्य जनतेला आरोग्य विषयक सुविधा मिळाव्या हा हेतू असतो. सांगोल्यातील आपघातातील घटनेमुळे पुन्हा एकदा आरोग्य विभागाविषयी नाराजीचा सूर उमटलेला दिसून आला. हा अपघात झाल्याचे बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियातून सगळीकडे पोहोचली. पोलीसांनीही तत्परतेने घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने मदत कार्य सुरू केले. जखमींना सांगोल्यातील ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले.

फक्त प्राथमिक उपचार करून या जखमी वारकऱ्यांना पुढे हलवण्यासाठीच ग्रामीण रुग्णालय होते की काय अशी अवस्था या घटनेत दिसून आली. पाचपैकी चार गंभीर जखमी पुढे हलवण्यात आले तर किरकोळ जखमी वारकऱ्याला फक्त दवाखान्यात ठेवण्यात आले. जखमींच्या गंभीरतेने त्यांना पुढे पाठविलेही असेल परंतु घटनेच्या तासाभरानंतर सांगोल्याचे वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. यामुळे संतप्त झालेल्या काहींनी डॉक्टरांना प्रश्नही विचारल्याने यावेळी काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षकांविषयी या अगोदरही अनेक तक्रारी होत्या. परंतु या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय अधीक्षक रुग्णालयात हजर असले पाहिजे असे उपस्थित नागरिकांनी बोलून दाखवले.

आरोग्यमंत्री लक्ष देणार का ?

सांगोल्यातील या अपघाताच्या घटनेनंतर राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी तत्परतेने दूरध्वनीवरून जखमींची विचारपूस केली व त्यांना हवी ती मदत देण्याचे आश्वासन केले. परंतु सांगोल्यातील आरोग्य विभागातील  अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाकडे आरोग्यमंत्री लक्ष देणार का ? सांगोल्यातील कोमात असणारा आरोग्य विभाग कोणत्या सलाईनीने दुरुस्त करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. कालच्या घटनेविषयी माहिती घेण्यास आरोग्यमंत्र्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

आमसभेतही आरोग्य विभागाविषयी होती नाराजी -

सांगोल्यात झालेल्या आमसभेमध्ये आरोग्य विभागाशी संबंधित अनेक प्रश्न उपस्थित केल्यामुळे नागरिकांनी आरोग्य विभाग चांगलाच धारेवर धरला होता. यावेळी आमदार शहाजी पाटील यांनी आरोग्य विभागाने नागरिकांच्या समस्या सोडवणे विषयी तत्परता दाखवावी असे खडे बोल सुनावलेही होते. परंतु तक्रारी करून आमसभेत प्रश्न उपस्थित करूनही सांगोल्यातील आरोग्य सेवेत मात्र सुधारणा होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com