Mangalwedha News : पशुवैद्यकीय विभागात पदभरती अभावी मुक्या जनावरांचे आरोग्य अंधारात; महत्वाची 19 पदे रिक्त

मंगळवेढा तालुक्यातील पशुवैद्यकीय विभागात पशुधन प्रयवेक्षकासह महत्वाची 19 पदे रिक्त असल्याने तालुक्यातील अडीच लाख पशूंच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
animal
animalesakal

सलगर बुद्रुक - मंगळवेढा तालुक्यातील पशुवैद्यकीय विभागात पशुधन प्रयवेक्षकासह महत्वाची 19 पदे रिक्त असल्याने तालुक्यातील अडीच लाख पशूंच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर पशुवैद्यकीय विभागातील पदभरती व्हावी अशी मागणी पशुपालक करत आहेत.

मंगळवेढा तालुक्यात 81 गावे आहेत. या 81 गावात मोठ्या जनावरांची संख्या 94 हजार 500 तर शेळ्या मेंढ्यांची संख्या 1 लाख 46 हजार आहे. याशिवाय बिगर नोंदणी असलेल्या लहान मोठ्या जनावरांची संख्या याच्यापेक्षा किती तरी अधिक आहे.

रिक्त पदे

पशुधन विकास अधिकारी -2

सहा.पशुधन विकास अधिकारी -1

पशुधन पर्यवेक्षक- 5

व्रणापचारक-2

परिचर-9

अशी एकूण मंजूर 42 पदांपैकी 19 पदे रिक्त आहेत.

मंगळवेढ्या तालुक्यात सलगर बुद्रुक, आंधळगाव, मरवडे, बोराळे, नंदेशवर, आरळी, मंगळवेढा, लक्ष्मीदहीवडी, हुन्नूर आदी 9 गावात श्रेणी 1 चे दवाखाने आहेत. तर शिरणांदगी, बठाण, पाठखळ, निंबोनी, हुलजंती या पाच गावात श्रेणी 2 चे दवाखाने आहेत.

कंत्राटी नेमणुकांना मुदत वाढ द्या -

कंत्राटी पद्धतीने नेमलेले सोलापूर जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक यांची मुदत संपून गेली आहे.त्यामुळे आशा कंत्राटी मुदत संपलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुदत वाढ देऊन त्यांना कामावर घ्यावे अशी मागणी मुदत संपलेल्या कंत्राटी पशुवैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांची आहे.

दरम्यान जिल्ह्यातील कुर्डुवाडी ता. माढा येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. कै. विश्वनाथ जागडे यांनी 10 जानेवारी पशुवैद्यकीय दवाखाण्यातच आत्महत्या केली होती. याचे प्रमुख कारण हे कामाचा अतिरिक्त ताण हे असल्याचे पशुवैद्यकीय विभागातील सकाळच्या सुत्रांनी सांगितले. या घटनेमुळे जिल्हा प्रशासन हादरले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत प्रशासनाने तात्काळ मंगळवेढा पशुवैद्यकीय विभागातील रिक्त पदे भरावीत व मुक्या जनावरांच्या आरोग्याची चिंता मिटवावी अशी मागणी होत आहे.

डॉ. सुहास सलगर,तालुका पशुवैद्यकीय अधिकारी मंगळवेढा -

पशुवैद्यकीय विभागातील रिक्त पदांमुळे पशूंना आरोग्याच्या सेवा देताना अडचणी होत आहेत. कर्तव्य बजावत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. शिवाय लंपी,लाळ खुरकत सारख्य साथीच्या रोगाच्या लसीकरणावेळी अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा अभाव जाणवतो.

पांडुरंग पुकळे, शेतकरी सलगर बुद्रुक -

माझ्याकडे संकरित दुभत्या गाई आहेत. संकरित गाई आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असते. गाई आजारी पडल्यानंतर उपचारासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन केला. पण पशुवैद्यकीय अधिकारी लंपी झालेल्या गाईंना उपचार करत होते. व सलगर येथील पशुधन पर्यवेक्षकाचे पद नसल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आमच्या गायीच्या उपचारास येता आले नाही. आम्ही खासगीत उपचार घेतले. यामुळे सलगर बुद्रुक येथील पशुधन पर्यवेक्षक पदाची भरती व्हावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com