
Teachers in Solapur overwhelmed as education officer gifts roses and books during a surprise school visit.
Sakal
सोलापूर: जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी शिक्षक दिनाच्या दिवशी एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला. त्यांनी शिक्षकांच्या घरी जाऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना सन्मानित केले. शाल, गुलाबपुष्प व पुस्तक सर्वांना भेट दिले. या अनपेक्षित आणि आकस्मिक भेटीने शिक्षक भारावून गेले होते.