
सोलापूर : कार जाण्यासाठी वाट न सोडणाऱ्या तरुणांसमोर हॉर्न वाजविणाऱ्या चालकास बाजूने जायला सांगितले. त्यावेळी एकमेकांना शिवीगाळ झाली आणि काही वेळाने दोन गटात दगडफेक सुरू झाली. त्यात अल्पवयीन मुले देखील सहभागी असल्याचे व्हिडिओत दिसतात. रविवारी (ता. २२) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना भवानी पेठेतील घोंगडे वस्ती परिसरात घडली आहे. दगडफेकीत तिघे जखमी झाले असून, वाहनांचेही नुकसान झाले आहे.