
Rescue teams at work to evacuate flood-affected residents as Sena River overflows, isolating seven villages.
Sakal
-आण्णा काळे
करमाळा : करमाळा तालुक्यात सीना नदीला महापूर आल्यामुळे नदीकाठची गावे पाण्याखाली गेली आहेत ता.15 सप्टेंबर रोजी सीना नदीला पूर आल्यानंतर पुन्हा एकदा आठ दिवसाच्या सीना नदीला महापूर आल्याने अनेक लोक अडकून पडले आहेत शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नदीच्या पाण्यात अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सीना नदीपलीकडेली तरटगाव, बाळेवाडी, वडाचीवाडी, बोरगाव, पाडळी, दिलमेश्वर, घारगाव, पाडळी गावाचा संपर्क तुटला आहे.