
Flooded fields along Kasal stream in Pandharpur Taluka after heavy overnight rain, damaging crops.
Sakal
पंढरपूर : तालुक्याच्या पश्चिम भागात रविवारी (ता. २१) रात्रभर मुसळधार पाऊस झाला. शेत शिवारात पाणीच पाणी साचले आहे. तर कासाळ ओढा दुथडी भरुन वाहू लागला आहे. उपरी, पळशी, सुपली, गार्डी, भंडीशेगाव, शेळवे या भागात शेतकऱ्यांच्या शेतात ओढ्याच्या पुराचे पाणी शिरले आहे. तर उपरी येथील बंधाऱ्याचा भराव वाहून गेला आहे. बोहाळी, उंबरगाव येथेही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.