

Bahaddar village drenched after recording 199 mm rainfall in a single day; locals stunned by the massive downpour.
Sakal
-प्रमोद बोडके
सोलापूर : बाजूच्या गावात कुठेच पाऊस नाही. गावातही पावसाचे वातावरणही नाही, मग भाळवणी महसूल मंडलात १९९ अन् भंडीशेगाव मंडलात १५३.३ मिमी पाऊस एकाच रात्रीत पडला कसा? पंढरपूर तालुक्यातील या दोन गावातील पावसाचे आकडे पाहून कृषी, महसूल आणि स्कायमेट कंपनीतील अधिकाऱ्यांच्या तोंडून आँ, एवढा पाऊस पडला कसा? असे उद्गार आपसूकच बाहेर पडले.