
"Wall collapse in Akkalkot taluka due to heavy rain — three injured as villages face blocked roads and flood-like conditions."
Sakal
अक्कलकोट: शहर व तालुक्यात शुक्रवार रात्री ते शनिवारी पहाटेपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत, पुन्हा शनिवारी दुपारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहर व तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे बोरी, हरणा नदीत पाणी वाढून कुरनुर धरणातून ४४०० चा विसर्ग करण्यात आल्याने धरणाखालील सुमारे २५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उजनी धरणातून भीमा, सीना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले. अक्कलकोट तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदीकाठच्या आठ व सीना नदीकाठच्या सात गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.