
मैंदर्गी: अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट शहरासह मैंदर्गी ग्रामीण भागात रविवारी (ता. १०) रात्री आठ ते बारापर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कुरनूर धरणातील बोरी नदी पात्रात मोठी वाढ झाली आहे. बोरी नदीचा विसर्ग वाढल्याने तसेच सातन दुधनी, तळेवाड, संगोगी, तोरणी, उडगी, नागोर, हालहळ्ळी आदी भागातील नदी व ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने काही तास या मार्गांवरील गावांचा संपर्क तुटला होता. तसेच नदी व ओढ्यांलगत असलेल्या शेती पिकांत पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.