
-भारत नागणे
पंढरपूर-: उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दोन्ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. पूरनियंत्रण करण्यासाठी उजनी आणि वीर धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.