
Fodder Shortage: Kadba Pendhi Price at ₹45 as Heavy Rain Destroys Crops
Sakal
-संदीप गायकवाड
उ. सोलापूर: अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे पशुपालकांचे अतोनात हाल सुरू आहेत. पावसामुळे चारा पिकांची पेरणीच कमी झाली, ज्या ठिकाणी झाली अतिवृष्टीने तेथील चारा सडला आहे आणि नदीकाठी पुरामुळे चारा वाहून गेल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या कडब्याची एक पेंडी ४५ रुपयांना तर हिरव्या चाऱ्याची पेंडी ८० रुपयांपर्यंत गेली आहे. जनावरांना अर्धपोटी ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.