
सांगोला: आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात ट्रॅक्टर, अवजारे, साधनसामग्री शेतीत आली असली तरी अजूनही बैलजोडीवर प्रेम करणारे, त्यांचे संवर्धन करणारी काही कुटुंब संस्कृती व परंपरेशी जोडलेले दिसतात. कोळे (ता. मोहोळ) येथील देशमुख कुटुंब हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. बैलजोडीवर कष्टाने शेती करत या कुटुंबाने आर्थिक प्रगती केली. परिसरात खिलार बैलांचे संगोपन करणारे देशमुख कुटुंबाने वेगळी ओळख निर्माण केली आहे.