

Bomb squad and sniffer dogs inspect Vitthal Temple premises after Delhi blast; police maintain high alert for devotees’ safety.
Sakal
पंढरपूर: दिल्लीतील स्फोटानंतर पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मंदिराचे व्हीआयपी गेट, पश्चिमद्वार, संत नामदेव पायरी येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाची तपासणी करूनच मंदिरात सोडले जात आहे. दरम्यान, आज बॉम्बशोध पथकाने श्वानाच्या मदतीने मंदिर व परिसराची तपासणी केली.