Mangalwedha Municipal Elections: 'मंगळवेढ्यात नगराध्यक्षपदासाठी 19 अर्ज तर नगरसेवकासाठी 160'; निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांची माहिती
Mangrulvedha Civic Polls: निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करण्याच्या जागी पक्ष आणि अपक्ष असे दोन पर्याय असल्यामुळे काल दुपारनंतर स्थानिक आघाडीचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक आघाडीच्या चिन्हावर आज बऱ्याच अपक्ष उमेदवारांनी पुन्हा कागदपत्राची जुळवाजुळव करत अर्ज दाखल केले.
मंगळवेढा: नगरपालिकेच्या 20 जागांसाठी तब्बल 160 उमेदवारांनी तर नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी 19 उमेदवारांनी आजअखेर अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी दिली.