

Dog squad conducts detailed inspection at Akkalkot bus stand, temple, and Annachhatra Mandal area; police maintain strict vigilance.
Sakal
अक्कलकोट: दिल्ली येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभर हाय अलर्ट देण्यात आला आहे. अक्कलकोट येथे मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आज वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट बसस्थानक व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या ठिकाणी पोलिस पथक व श्र्वानपथकाच्या मदतीने तपासणी करण्यात आली. पुढील दोन-तीन दिवस ही तपासणी कायम राहणार असल्याचे संकेत पोलिस खात्याने दिले आहे.