
सोलापूर: एसटी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी नवीन वर्षात प्रोत्साहन भत्ता योजना राबविण्याचे ठरविले आहे. या योजनेंतर्गत चालक-वाहकांसाठी १ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता देण्याचे ठरविले आहे. वाढीव उत्पन्नावर चालक वाहकांना कमिशन देण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी दिली.