
संत ज्ञानेश्वर माउली पालखीमार्ग : महाविद्यालयात शिकणाऱ्या अहमदपूर (ता. लातूर) येथील विद्यार्थिनींनी वडिलांच्या पंगत सेवेच्या निमित्ताने वारीत सहभागी होण्याची संधी मिळवली. वारीच्या निमित्ताने फुगडी, अभंग गायन व अन्नदानाच्या सेवेचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.