

Historic stone secured near bridge site as demolition awaits railway clearance.
Sakal
सोलापूर : दमाणीनगर रेल्वे पुलाचे पाडकाम रविवारी पूर्ण झाले. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी काम बंदच ठेवण्यात आले होते. मंगळवारी काही तास पुलाचा उर्वरित भाग पाडण्यास सुरुवात करण्यात आली. पण पूल पाडकाम करताना त्याचा काही भाग रेल्वे रूळावर पडत असल्याने काम करताना रेल्वे विभागाकडून परवानगी घ्यावी लागत होती. बुधवारी पाडकामाची स्थिती ‘जैसे थे’ होती. पण दोन्ही बाजूचे ते ऐतिहासिक दगड सुरक्षित काढून ठेवण्यात आले आहेत.