सोलापूर : सध्या नांदणी (जि. कोल्हापूर) मठातील महादेवी (माधुरी) हत्तीणीला वनतारामधून परत आणण्यासाठी मोठा लढा सुरू आहे. शिवकाळात जिल्ह्यात अक्कलकोट संस्थानबरोबरच पानगाव व वैराग येथेही हत्ती होते. या दोन्हीही ठिकाणी हत्तीला पोहण्यासाठी बांधण्यात आलेले हत्ती तलाव आजही त्या वैभवाची साक्ष देत आहेत.