esakal | मुलाच्या हट्टातून घेतल्या 900 गाड्या (video)
sakal

बोलून बातमी शोधा

Hobbies of fourth grade students in Solapur

तनुज म्हणाला, मी "कार' चित्रपट पाहिला. त्यातली गाडी मला आवडली. त्या वेळी पप्पांनाही तो चित्रपट आवडला होता. त्यामुळे त्यांनीही मला गाड्या आणून दिल्या. मी त्या गाड्यांचा संग्रह करत गेलो.

मुलाच्या हट्टातून घेतल्या 900 गाड्या (video)

sakal_logo
By
सुस्मिता वडतीले

सोलापूर : प्रत्येकाला कशाचा ना कशाचा तरी छंद असतोच. असाच चौथीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला गाड्या जमा करण्याचा छंद लागला. त्याचे नाव तनुज रविराज उपलप. एका चित्रपटातील गाडी पाहून खेळणीसाठी म्हणून त्याच्या पप्पांनी त्याला गाडी आणली आणि तो प्रभावित झाला. पुढे एक एक करत चक्क 900 गाड्यांचा संग्रह त्याच्याकडे झाला असून या सर्व गाड्या देश-परदेशातून मागवलेल्या आहेत. या गाड्यांमध्ये काही गाड्या जगात खूप कमी जणांकडे आहेत, असे तनुजचे वडील रविराज यांनी सांगितले.

 
तनुज म्हणाला, मी "कार' चित्रपट पाहिला. त्यातली गाडी मला आवडली. त्या वेळी पप्पांनाही तो चित्रपट आवडला होता. त्यामुळे त्यांनीही मला गाड्या आणून दिल्या. मी त्या गाड्यांचा संग्रह करत गेलो. रविराज उपलप म्हणाले, मुलाचा हट्ट आणि गाड्यांची मला असलेली आवड यामुळे 2014 पासून हा गाड्यांचा संग्रह झाला आहे. "कार' हा चित्रपट 2016 मध्ये आला होता. तो पूर्ण गाड्यांवर आहे. तेथून पुढे मी गाड्या जमा करायला सुरवात केली. अजूनही मी गाड्या मागवत असतो. यातील गाड्या भारतासह जपान, अमेरिका, स्पेन येथून मागवल्या आहेत. परदेशात काही नातेवाईक आहेत. त्यांच्यामार्फत या गाड्या मागवल्या जातात. काही गाड्या या कुरिअरने मागवल्या आहेत. सुरवातीला 30- 40 गाड्या जमा झाल्यानंतर मलाही या गाड्यांचा संग्रह करण्याचा छंद लागला. यातील एक गाडी अशी आहे, की ती जगात फक्त ती 500 तयार झाल्या आहेत. त्यातील एक गाडी आमच्याकडे आहे. यातील काही कार रिलीज केल्या जातात. मात्र, पुन्हा त्या कॅन्सल केल्या जातात. त्यापैकी काही गाडी माझ्याकडे आहेत. अजून किती गाड्यांचा संग्रह होईल माहीत नाही, पण आणखी नव्याने गाड्या आम्ही मागवत आहोत. गाड्या मागवताना अनेकदा कित्येक महिने वाट पाहावी लागते. काहीवेळा दुसऱ्याच ठिकाणी गाड्या जातात, असे अनेकदा झालेले आहे. 
 
आणखी गाड्या जमा करणार 
छंदातून या गाड्या जमा केल्या आहेत. या गाड्यांचे आणखी संग्रह झाल्यानंतर भविष्यात याचे प्रदर्शन भरवण्याचा विचार करत आहे. हे समुद्रासारखा छंदच झाला आहे. याचे कलेक्‍शन आणखी वाढतच चाललेले आहे.

loading image