ग्रामीण भागातील होम आयसोलेशन होणार बंद !

ग्रामीण भागातील होम आयसोलेशन होणार बंद !
Summary

कोरोना बाधित रुग्णांना आता कोरोना केअर सेंटर आणि संबंधित कोविड रुग्णालयातच उपचार घेणे बंधनकारक असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

सोलापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना (Corona) बाधित आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे आकडे दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहेत. याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने (District Administration) कठोर निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील अनेक रुग्ण हे उपचारासाठी रुग्णालयात पोहचत नाहीत आणि घरीच उपचार घेत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना होम आयसोलेशनची मुभा देण्यात आली होती. (Home Isolation in rural areas in solapur has been banned, informed district collector milind shambharkar)

ग्रामीण भागातील होम आयसोलेशन होणार बंद !
सोलापूर विद्यापीठाची जुलै व ऑगस्टमधील परीक्षाही ऑनलाइनच !

मात्र त्याचे फारसे सकारात्मक परिणाम दिसून येत नसल्याने ग्रामीण भागात अपवादात्मक परिस्थिती वगळता होम आयसोलेशनवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना आता कोरोना केअर सेंटर आणि संबंधित कोविड रुग्णालयातच उपचार घेणे बंधनकारक असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

ग्रामीण भागातील होम आयसोलेशन होणार बंद !
रेमडेसिव्हिरच्या तुटवड्याचे खापर सोलापूर प्रशासनाने फोडले रुग्णांच्या माथ्यावर 

जिल्ह्यात आत्तापर्यंत 14 लाख जणांना गृह विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले होते. त्यापैकी 12 लाख जण बरे झाले आहेत. अद्याप 1 लाख 14 हजार रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. त्यामुळे आता या सर्व होम आयसोलेशन मधील बाधित रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखी खाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील होम आयसोलेशन होणार बंद !
सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच सोलापूर-पुणे "मेमू' धावणार ! कधीपासून? वाचा सविस्तर

यामध्ये सौम्य लक्षण असणाऱ्यांना इन्स्टिट्यूशनल सेंटरमध्ये तर गंभीर लक्षण असणाऱ्यांना रुग्णालयात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक गावपातळीवर इन्स्टिट्यूशनल सेंटर उभा करण्यासाठी ग्रामस्थ, महसूल अधिकार आणि पोलिसांनी पुढाकार घेण्याची सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. गावातील शाळा, महाविद्यालये, मंदिर, मंगल कार्यालये यांचा देखील उपयोग इन्स्टिट्यूशनल सेंटरसाठी करावा असं ही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. (Home Isolation in rural areas in solapur has been banned, informed district collector milind shambharkar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com