

Hospitals Overflow as Pneumonia and Severe Cold Cases Rise Amid Chilly Weather
sakal
पिंपळनेर : यंदाच्या हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढले असून, दिवाळीपासून हळूहळू सुरू झालेल्या वातावरणातील गारव्यात गेल्या आठवड्यापासून वाढ झाली आहे. माढा तालुक्याच्या पश्चिम भागात, पिंपळनेर, निमगाव परिसरात थंडीची लाट पसरली आहे. गुलाबी थंडीतील झोंबणाऱ्या गारव्याने ग्रामीण भागातील रुग्णालयांत सर्दी, खोकला व न्यूमोनियासारख्या आजारांच्या रूग्णांबरोबरच हृदयविकार, रक्तदाबाच्या रुग्णांचीही वाढ होत आहे.