

hotel 7777 vide viral
esakal
टेंभुर्णी: सोलापूर- पुणे महामार्गाच्या टेंभुर्णीतील बायपास रस्त्यावरील हॉटेल ७७७७ च्या मालकाने ‘तू काम नीट का करीत नाही, तुला जास्त मस्ती आली आहे काय’ असे म्हणून मॅनेजरच्या अंगावरील कपडे काढून, खिशातील दोन हजार रुपये काढून घेऊन कामगारांसमोर त्यास शिवीगाळ करीत लोखंडी पाइपने अमानुषपणे मारहाण केली.
तीन महिन्यांपूर्वीच्या या घटनेचा व्हिडिओ माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर टेंभुर्णी पोलिसांनी तातडीने या घटनेची दखल घेतली. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात हॉटेल मालक लखन हरिदास माने (रा. टेंभुर्णी, ता. माढा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, टेंभुर्णी पोलिसांनी त्यास अटक केली आहे.