

Big Offer by Hotgi Math; Shivacharya Backs Community Decision
sakal
सोलापूर: स्मशानभूमीसाठी आपणच दहा एकर जागा देऊ; दोन एकरचा विषय सोडा. मठ आणि मंदिर एकच आहेत. स्मशानभूमीवरून समाजामध्ये तेढ नको. परंतु, लिंगायत स्मशानभूमी विषयात प्रशासनाविरुद्ध समाज लढत आहे. या विषयात मठ समाजासोबत आहे, असा निर्णय काशी पीठ जगद्गुरु डॉ. श्री मल्लिकार्जुन शिवाचार्य यांनी समाजाच्या बैठकीत सांगितला.