

A Beautiful Cross-Border Bond: US Native Begins New Life in Katphal
Sakal
महूद : प्रेमाला जात, धर्म, देशांच्या सीमा असे कुठलेही बंधन नसते. याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. सांगोला तालुक्यातील कटफळ हे मूळ गाव असणाऱ्या तरुणाने अमेरिकेतील ओरेगॉन राज्यातील डॉक्टर मुलीबरोबर नुकताच पाचगणी येथे विवाहाची रेशीमगाठ बांधली. त्यामुळे अमेरिकन कन्या कटफळची सून झाली आहे.