विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान कसे शिकायचे? शिक्षकांची 16 हजार पदे रिक्‍त; संच मान्यता शिबिरांच्या ठरल्या तारखा

2children_0.jpg
2children_0.jpg

सोलापूर : जिल्हा परिषदांसह शासकीय शाळांमधील मुलांची गुणवत्ता वाढावी, विद्यार्थ्यांची गळती कमी होऊन पटसंख्या वाढावी म्हणून शालेय शिक्षण विभागातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, शासकीय शाळांमधील सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी गणीत व विज्ञान विषयांचे शिक्षकच नसल्याचे समोर आले आहे. सोलापूर जिल्ह्यात तब्बल चारशेहून अधिक तर राज्यभरातील शासकीय शाळांमध्ये या विषयांचे पाच हजारांहून अधिक पदे रिक्‍त असल्याचे शिक्षण संचालक कार्यालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

तीन वर्षांनंतर समजल्या संच मान्यतेतील त्रुटी 
शालेय शिक्षण विभागाने 24 एप्रिल 2017 रोजी केलेल्या संचमान्यतेत मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याची बाब तब्बल तीन वर्षांनंतर समोर आली आहे. आता संबंधित शिक्षण संस्थांनी त्रुटींची पूर्तता करुन परिपूर्ण प्रस्ताव फेरसादर करण्याचे आदेश शिक्षण संचालक डी. जी. जगताप यांनी दिले असून त्यासाठी 19 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या काळात राज्यभर संचमान्यता दुरुस्ती शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांसाठी 19, 20 जानेवारी, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारसाठी 21, 22 जानेवारी, लातूर, नांदेड, उस्मानाबादसाठी 28, 29 जानेवारी, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदूर्गसाठी 2, 3 फेब्रुवारी, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोलीसाठी 4, 5 फेब्रुवारी, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिमसाठी 9, 10 फेब्रुवारी, नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूरसाठी 11, 12 फेब्रुवारी आणि पुणे, नगर, सोलापूरसाठी 16, 17 फेब्रुवारीची तारीख देण्यात आली आहे.

राज्यात सद्यस्थितीत पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांची तब्बल 16 हजारांहून अधिक पदे रिक्‍त आहेत. तत्कालीन फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या शिक्षक भरतीतील सहा हजार पदांची भरती करण्याचे विद्यमान सरकारने जाहीर करुनही काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. शालेय जीवनात शिक्षण घेत असताना विज्ञान, गणित व इंग्रजीचा पाया मजबूत झाल्यानंतर तो विद्यार्थी निश्‍चितपणे उच्च शिक्षण चांगल्याप्रकारे घेतो. दुसरीकडे इंग्रजी, गणित विषय जमत नसल्याने अनेकजण मधूनच शाळा सोडून देतात, अशीही उदाहरणे आहेत. या पार्श्‍वभूमीवर सहावी ते आठवीपर्यंतच्या मुलांना इंग्रजी, गणित व विज्ञान विषयांतील स्पेशालिस्ट शिक्षकांची गरज आहे. मात्र, विज्ञानमधून बारावी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांवर या विषयांची जबाबदारी दिल्याचे अनेक शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.


अध्यापनासाठी पर्यायी व्यवस्था
जिल्ह्यात बीएससी- बीएड झालेले 52 शिक्षक आहेत. गणित व विज्ञान विषयांचे सुमारे चारशे शिक्षक कमी आहेत. त्यामुळे सहावी ते आठवीच्या वर्गाला शिकविण्याची जबाबदारी बारावी विज्ञान शाखेतील शिक्षकांवर सोपविली आहे. 
- संजयकुमार राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com