esakal | संभाजी तलावातील शेकडो मासे मृत्युमुखी! कारण मात्र अस्पष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजी तलावातील शेकडो मासे मृत्युमुखी! कारण मात्र अस्पष्ट

शहरातील छत्रपती संभाजी तलावात बुधवारी (ता. 8) शेकडो मासे मृतावस्थेत आढळल्याची घटना घडली.

संभाजी तलावातील शेकडो मासे मृत्युमुखी! कारण मात्र अस्पष्ट

sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर : शहरातील छत्रपती संभाजी तलावात (Chhatrapati Sambhaji Lake) बुधवारी (ता. 8) शेकडो मासे (Fish) मृतावस्थेत आढळल्याची घटना घडली. हा प्रकार नेमका कशामुळे झाला, याचे कारण सापडले नसले तरी तलावात येणारे ड्रेनेजचे पाणी, गाळ काढण्याची मोहीम आदी मुद्दे समोर आले आहेत. मागील काही दिवसांपासून संभाजी तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असतानाच अचानक मोठ्या प्रमाणात मासे पाण्यात तंरगताना आढळले आहेत. त्याचे कारण अद्यापतरी स्पष्ट झाले नाही.

हेही वाचा: किडनी देण्याचे आमिष; एक लाख 70 हजार रुपयांचा गंडा! मेव्हण्यासह दोघांवर गुन्हा

मागील दोन वर्षांपासून या तलावातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. तसेच गाळ देखील काढण्यात आला. त्यामुळे तलावाचे नैसर्गिक जलस्रोताचे स्वरूप बदलले आहे. तसेच या तलावात ड्रेनेजचे पाणी सोडले जात असल्याने जलप्रदूषण होत असल्याचे सातत्याने नागरिकांचे म्हणणे आहे. मासे मरण्याची घटना काही महिन्यांपूर्वी देखील घडली होती. या घटनेची पुनरावृत्ती होणे ही बाब तलावाचा नैसर्गिक समतोल बिघडण्याचे कारण आहे, असेही मानले जाते आहे.

हेही वाचा: अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून! तुळजापूर रोड येथील घटना

पाण्यातील ऑक्‍सिजनच्या कमतरतेमुळेही मासे मृत्युमुखी पडू शकतात, असे सांगितले जात आहे. जलपर्णी असताना पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण व जलपर्णी काढल्यानंतरचे ऑक्‍सिजन पातळी याचा कोणताच अभ्यास नसल्याने हा प्रकार झाला आहे. तसेच ड्रेनेजच्या पाण्यातून अनेक विषारी रसायने तलावात सोडली जात असल्याने माशांच्या अस्तित्वाला तो एक धोकाच असल्याचे मानले जाते. तलावाचे सुशोभीकरण करत असताना तलावाचा नैसर्गिक समतोल साधण्याबाबत विचार केला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

छत्रपती संभाजी तलावातील मासे मृत्युमुखी पडण्याच्या प्रकाराची पाणी नमुन्याच्या तपासणीच्या आधारावर चौकशी व्हावी. त्यामुळे पुढील काळात हे प्रकार टाळता येऊ शकतात.

- भरत छेडा, निसर्ग अभ्यासक, सोलापूर

loading image
go to top