esakal | Solapur : खंडाळी येथे शेतकरी पती-पत्नीची आत्महत्या!
sakal

बोलून बातमी शोधा

Khandali
नातेवाइकांनी शोध घेतला असता एका नातेवाइकाला दोघेही पती-पत्नी टोमॅटो प्लॉटमधील लिंबाच्या झाडाखाली अगदी थोड्या थोड्या अंतरावर मृतावस्थेत आढळून आले. #esakal #viral #marathinews #sakalnews #MaharashtraNews #SolapurNews #MoholNews

खंडाळी येथे शेतकरी पती-पत्नीची आत्महत्या!

sakal_logo
By
राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : एका शेतकरी दाम्पत्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना खंडाळी (ता. मोहोळ) येथे गुरुवारी (ता. 7) मध्यरात्रीनंतर घडली. पोपट बाबूराव मुळे (वय 65), कमल पोपट मुळे (वय 56) अशी आत्महत्या केलेल्या पती - पत्नीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोपट मुळे व कमल मुळे हे पती - पत्नी खंडाळी येथे शेती करतात. गुरुवारी सायंकाळी चार वाजता घरातून अज्ञात कारणावरून दोघे पती-पत्नी घरातून बाहेर पडले. रात्र झाली तरी दोघेही घरी न आल्याने नातेवाइकांनी रात्रभर शोधाशोध केली मात्र ते मिळून आले नाहीत.

हेही वाचा: निवडणुकीपूर्वी पहिले भाषण सोलापुरातच केलं अन्‌ भाजप सरकार पडलं!

दरम्यान, सकाळी पुन्हा नातेवाइकांनी शोध घेतला असता एका नातेवाइकाला दोघेही पती-पत्नी टोमॅटो प्लॉटमधील लिंबाच्या झाडाखाली अगदी थोड्या थोड्या अंतरावर मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या तोंडाला फेस आला होता तर कसला तरी कीटक नाशकाचा वास आल्याचे त्या नातेवाइकांनी सांगितले. या घटनेची खबर बाळू केरु मुळे (रा. खंडाळी) यांनी मोहोळ पोलिसात दिली असून, अधिक तपास हवालदार चंद्रकांत आदलिंगे करीत आहेत.

loading image
go to top