esakal | निवडणुकीपूर्वी पहिले भाषण सोलापुरातच केलं अन्‌ भाजप सरकार पडलं !
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणुकीपूर्वी पहिले भाषण सोलापुरातच केलं अन्‌ भाजप सरकार पडलं

निवडणुकीपूर्वी पहिले भाषण सोलापुरातच केले होते आणि भाजपचं सरकार पडलं.

निवडणुकीपूर्वी पहिले भाषण सोलापुरातच केलं अन्‌ भाजप सरकार पडलं!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : बऱ्याच दिवसांनी मी सोलापूरला (Solapur) आलो आहे. कोरोना (Covid-19) काळात पहिला दौराही सोलापुरातच केला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेकजण पक्ष सोडून जात होते. तेव्हा संघर्ष करण्याची सुरवात सोलापुरात झाली होती. पहिली सभा सोलापुरातच झाली होती. निवडणुकीपूर्वी पहिले भाषण सोलापुरातच केले होते आणि भाजपचं (BJP) सरकार पडलं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाले, अशी आठवण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काढली.

हेही वाचा: NCPचा कॉंग्रेसला धक्‍का! माजी महापौर, माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादीत

शरद पवार हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर आले. या वेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी पक्षातील अनेकजण दुसऱ्या पक्षात जात होते. अशा संघर्षाच्या काळात पहिली सभा सोलापुरात झाली होती. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. पुढे काय झाले हे तुम्ही पाहिलेच. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार स्थापन झाले.

पुढे बोलताना पवार म्हणाले, जवाहरलाल नेहरू यांनी सुविधा देण्यावर भर दिला पण आताचे सरकार काय करते? नवीन रेल्वेलाइन या सरकारने टाकली नाही पण रेल्वेचे खासगीकरण करण्यावर या सरकारचा भर आहे. त्यामुळे या सरकारला विरोध करण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. महागाई वाढत असून याचा सर्व घटकांवर परिणाम होत आहे. महागाईला निमंत्रण देण्याची वृत्ती भाजप सरकारची असल्याची दिसत आहे. याला विरोध करण्याची गरज आहे.

हेही वाचा: मला ईडीची नोटीस पाठवणाऱ्या भाजपला लोकांनी वेडी ठरवलं - पवार

या सरकारला शेतकऱ्यांबाबत आस्था नाही. उत्तर प्रदेशात भाजपच्या नेत्यांनी शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली. त्यांची हत्या भाजपच्या नेत्यांनी केली. याचा संताप सर्वत्र व्यक्त झाला. भाजपचा निषेध करण्यासाठी सोमवारी बंदमध्ये शांततेच्या मार्गाने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

सोलापूर महापालिका निवडणुकीबाबत बोलताना पवार म्हणाले, गेल्यावेळी निवडणुकीनंतर महापालिका दुसऱ्याच्या ताब्यात गेली. भाजप सोडून सर्वांशी हातमिळवणी करून आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे. सन्मानपूर्वक आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे. निवडणुकीत तिकीट देताना तरुण कार्यकर्त्यांना विसरू नका. महिला व अल्पसंख्यकांना संधी द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

loading image
go to top