Barshi Crime : धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; डोक्यात खलबत्ता घालून केला खून

संशयाच्या कारणावरून पतीने पत्नीची हत्या करून स्वतःही आत्महत्या केली.
Crime News
Crime Newsesakal
Summary

डोक्यामध्ये बत्ता घालून पत्नी गंगाबाई हिचा खून करून पती धनाजी गायकवाड याने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बार्शी : जामगाव (ता. बार्शी) येथे संशयाच्या कारणावरून पतीने पत्नीची हत्या करून स्वतःही आत्महत्या केली असून, बार्शी तालुका पोलिस (Barshi Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शनिवारी (ता. २) घडली असून, रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

Crime News
धक्कादायक! 'प्रेम करताना जात धर्म बघू नका'; स्टेटस्‌ ठेवून आंतरधर्मीय प्रेमी युगुलाची एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या

पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. आत्महत्या केलेला संशयित आरोपी धनाजी संभाजी गायकवाड (वय ४५, रा. जामगाव आ) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Crime News
..अखेर 35 हजाराला विकलेला चिमुरडा सापडला; आईनं 'डुगु' हाक मारताच पोलिसांचेही डोळे पाणावले, असं स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं?

गंगाबाई धनाजी गायकवाड (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. बालाजी कागदे यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना जामगाव येथे शनिवारी सायंकाळी सहापूर्वी घडली. डोक्यामध्ये बत्ता घालून पत्नी गंगाबाई हिचा खून करून पती धनाजी गायकवाड याने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com