Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Court Verdict: लक्ष्मी हिने गॅस टाकी आणण्यासाठी म्हणून घरातील कपाटात एक हजारांची रोकड ठेवली होती. मनोज याने दारु पिण्यासाठी त्यातील १०० रुपये काढून घेतले. त्याबाबत त्याला लक्ष्मी हिने त्याला विचारणा केली. त्यावर रागाच्या भरात त्याने लोखंडी पाईपने तिच्या डोक्यावर मारले.
Shocking: Man Spends Gas Cylinder Money on Liquor, Kills Wife in Drunken Rage

Shocking: Man Spends Gas Cylinder Money on Liquor, Kills Wife in Drunken Rage

sakal

Updated on

सोलापूर: पत्नीने गॅस टाकी आणण्यासाठी ठेवलेल्या एक हजार रुपयातून पतीने दारु पिण्यासाठी १०० रुपये घेतले. त्याबाबत विचारणा केल्याने लोखंडी पाईपने तिच्या डोक्यावर मारुन तिचा खून केल्याप्रकरणी पतीला जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मनोज शर्मा यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com