
उ. सोलापूर : भरधाव जाणाऱ्या कारने दुचाकी वरील दाम्पत्याला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकी वरील दाम्पत्य समोर जात असलेल्या आयशर टेम्पो खाली गेले. या अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता मोहोळ तालुक्यातील वाघोली येथे सोलापूर कोल्हापूर महामार्गावर हा अपघात घडला. चेतन अवताडे (वय २४) असे मृताचे नाव आहे.