दारू का पिता, असे विचारल्याने केला पतीने पत्नीचा खून  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

दारू पिण्याच्या कारणावरून पत्नी सतत बोलत असल्याने, पतीने तिचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना बुधवारी (ता. 11) दुपारी साडेतीनच्या सुमारास पंढरपुरात घडली. राधिका बाबा सावतराव (वय 49, रा. जुना सोलापूर नाका झोपडपट्टी, हनुमान टेकडी, गोशाळा, पंढरपूर, जि. सोलापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. 

दारू का पिता, असे विचारल्याने केला पतीने पत्नीचा खून 

पंढरपूर (सोलापूर) : दारू पिण्याच्या कारणावरून पत्नी सतत बोलत असल्याने, पतीने तिचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना बुधवारी (ता. 11) दुपारी साडेतीनच्या सुमारास पंढरपुरात घडली. राधिका बाबा सावतराव (वय 49, रा. जुना सोलापूर नाका झोपडपट्टी, हनुमान टेकडी, गोशाळा, पंढरपूर, जि. सोलापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. 

याबाबतची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की राधिका सावतराव यांचा पती बाबा लक्ष्मण सावतराव हा सतत दारू पित असे. यामुळे राधिका या बाबा सावतराव यांना दारू पीत असल्याच्या कारणावरून नेहमी बोलत होत्या. याचा राग मनात धरून पती बाबा सावतराव हा घरातील लाकडे तोडण्याच्या कुऱ्हाडीने तिच्या डोक्‍यात घाव घालून तिला ठार मारले. याबाबत त्यांचा मुलगा शिवम बाबा सावतराव (वय 19) याने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मगदुम हे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top