esakal | माठच विकले नाही तर वर्षभर खायचे काय
sakal

बोलून बातमी शोधा

माठच विकले नाही तर वर्षभर खायचे काय

माल खरेदी व विक्री बंद झाल्याने या विक्रेत्यांचे हाल झाले. कमाईचा पैसा हातात नसल्याने स्वस्त धान्य दुकानातून बऱ्यापैकी धान्य मिळाल्याने त्यावर त्यांना गुजराण करावी लागली. दीड ते दोन महिन्यांचा कालावधी केवळ स्वस्त धान्यावर काढावा लागला. तोपर्यंत माठ विक्रीचा हंगाम अर्ध्यापेक्षा अधिक संपत आला. आता जुना साठवलेला माल विक्री करण्यासाठी या विक्रेत्यांनी बाहेर काढला आहे.

माठच विकले नाही तर वर्षभर खायचे काय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर ः दरवर्षी उन्हाळ्यात माठाच्या विक्री व्यवसायातून होणाऱ्या कमाईतून घरखर्च चालायचा. आता तर माठ नाहीत आणि ग्राहक नसल्याने वर्षभर घर कसे चालवायचे, या प्रश्‍नाचे उत्तर कोणाकडे नाही. लॉकडाउनने माठ विक्रेत्याची ही अवस्था व्यवसायाची वाताहत मांडणारी आहे. या वेळी लॉकडाउनने मालही मिळाला नाही.

हेही वाचा ः मोहिते-पाटील घराण्याला अखेर न्याय मिळाला

जानेवारीपासून माठाची विक्री करण्याच्या हंगामास सुरवात होते. राजस्थान, पश्‍चिम बंगाल व अहमदाबाद (गुजरात) या भागातून कलाकुसर असलेले माठाचे अनेक प्रकार मागवले जातात. स्थानिक माती कारागीर माठ बनवून विक्रीस आणतात. वाहतूक खर्च करून शहरात अनेक प्रकारचे माठ विक्रीस येतात. अगदी सुरवातीला म्हणजे जानेवारीअखेर कारागिरांनी जो काही माल मागवला होता तो माल लॉकडाउन असल्याने विकता आला नाही. नंतर माल मागवण्यासाठी माल वाहतुकीची सोय नव्हती. दुकाने व व्यापार बंद असल्याने माल विक्री देखील बंद झाली.

हेही वाचा ः आमदार राम सातपुते यांना होम क्वारंटाईन करण्याचा आदेश

माल खरेदी व विक्री बंद झाल्याने या विक्रेत्यांचे हाल झाले. कमाईचा पैसा हातात नसल्याने स्वस्त धान्य दुकानातून बऱ्यापैकी धान्य मिळाल्याने त्यावर त्यांना गुजराण करावी लागली. दीड ते दोन महिन्यांचा कालावधी केवळ स्वस्त धान्यावर काढावा लागला. तोपर्यंत माठ विक्रीचा हंगाम अर्ध्यापेक्षा अधिक संपत आला. आता जुना साठवलेला माल विक्री करण्यासाठी या विक्रेत्यांनी बाहेर काढला आहे. पण लॉकडाउनने त्याला ग्राहक मिळेनासा झाला आहे. आता कमाई नसेल तर उद्याचा दिवस कसा घालवायचा, या प्रश्‍नाचे उत्तर हे माती कारागीर शोधत आहेत. मातीची कला वापरून केलेल्या या धंद्यात हजारो कारागीरांचीच माती होण्याची वेळ आली आहे. वर्षभर पुन्हा कमाई होत नाही. आता रेशनचे धान्य मिळाले तरी मीठमीरचीसारखे पदार्थ घेण्यासाठी कमाईचे पैसे तर जवळ नाहीत अशी स्थिती झाली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर कोणतेच माती काम करता येत नाही. या कारागिराच्या दुःखाकडे कोण लक्ष देण्यास तयार नाही.

माल विकूनही वर्षभराचा घरखर्च निघणे अशक्‍यच
आता महिनाभर उन्हाळा असून माल विकूनही वर्षभराचा घरखर्च निघणे अशक्‍यच झाले आहे. गेल्या वर्षी तयार केलेल माठांची सध्या विक्री करत आहोत मात्र यानंतर ममोलमजुरी करून वर्ष घालवावे लागणार आहे
- देविदास कुबडे, सिद्धेश्‍वर पेठ, सोलापूर
loading image