

Illegal Abortion Scam Unearthed; More Than 50 Foetuses Aborted Illegally
sakal
बार्शी शहर : बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणी पोलिस उपअधीक्षक अशोक सायकर यांच्या नेतृत्वातील पथकाने आणखी तिघांना अटक केली आहे. गुन्ह्यातील संशयित आरोपींची संख्या आता सहावर पोचली आहे. रात्री अटक केलेल्या संशयितांना बार्शी सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. त्यात वैरागचा डॉक्टर, उंदरगावचा फार्मासिस्ट व बार्शीतील परिचारिका आहे.