Solapur: हातभट्टीमुळे पती गेला,मुलगाही त्याच वाटेवर; पोलिसांकडे हातभट्ट्यांच्या ठिकाणांची माहिती, तरी नाही कारवाई

Illicit Liquor Destroys Family: दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख जून २०२३ मध्ये तदारसंघात गावभेट दौरा करीत होते. त्यावेळी तालुक्यातील विंचूर, कुसुर, बोळकवठे, सुलेरजवळगे, फताटेवाडी अशा ठिकाणच्या महिलांनी दोनदा निवेदने दिली.
Despite Police Intel, No Action on Illegal Liquor Dens in Village
Despite Police Intel, No Action on Illegal Liquor Dens in Villagesakal
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्हा गावागावात सहजपणे मिळणाऱ्या हातभट्टीमुळे राज्यभर ओळखला जातो. आई-वडिलांची म्हातारपणाची काठी म्हणजेच तरुण मुले हातभट्टीच्या आहारी जात आहेत. गावात पोलिस गेल्यावर त्यांना ते तरुण रस्त्यात कोठेही पडलेले दिसतात. तरीसुद्धा, अवैध हातभट्टीची विक्री खुलेआम सुरू आहे हे विशेष. पती हातभट्टीच्या व्यसनातून आजारी पडून मृत झाला आणि आता मुलगाही त्याच वाटेवर असल्याची व्यथा दक्षिण सोलापुरातील विंचूर गावातील विधवा महिलेने ‘सकाळ’कडे मांडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com