A Solapur village alley where illegal hand-brewed liquor operations run uninterrupted, affecting families and women.esakal
सोलापूर
Solapur Alcohol Crisis : धक्कादायक! 'पती हातभट्टीच्या आहारी अन् विवाहिता माहेरी': साेलापुरातील गावागावांतील चित्र; हातभट्ट्या दिवस-रात्र सुरू
Illicit Liquor Ruins Families : गावागावातील महिलांच्या कुटुंबात हातभट्टीमुळे विघ्न निर्माण झाले आहे, गावातील लोक पोलिसांना निवेदने देत आहेत. गावांनी दारूबंदीचे ठरावसुद्धा केले, तरीपण ना हातभट्ट्यांवर छापे ना हातभट्टी विक्रेत्यांवर कारवाई.
सोलापूर: काम सोडून पती गावातच हातभट्टी पिऊन पडतोय, घरी आला की सतत भांडण करतो, घरखर्चासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे देत नाही, अशा त्रासाला कंटाळून गावागावांतील विवाहिता माहेरी निघून गेल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अनेक महिलांनी घटस्फोटासाठी देखील अर्ज केले आहेत.