esakal | यंदा 330 गावांत "एक गाव-एक गणपती'! "असा' साजरा होणार उत्सव
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा 330 गावांत 'एक गाव-एक गणपती'! 'असा' साजरा होणार उत्सव

यंदा सुमारे 330 गावांमध्ये "एक गाव-एक गणपती' उपक्रम राबविला जाणार आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.

यंदा 330 गावांत 'एक गाव-एक गणपती'! 'असा' साजरा होणार उत्सव

sakal_logo
By
सुनील राऊत

नातेपुते (सोलापूर) : गणेशोत्सवात (Ganeshotsav) सोलापूर (Solapur) ग्रामीण भागात 1 हजार 944 सार्वजनिक मंडळांची नोंद झाली असून, 2019 साली 2 हजार 700 सार्वजनिक मंडळे होती. यंदा सुमारे 330 गावांमध्ये 'एक गाव-एक गणपती' उपक्रम राबविला जाणार आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे (Upper Superintendent of Police Atul Zende) यांनी "सकाळ'ला दिली.

हेही वाचा: अफगाणमधून विद्यार्थ्याने दिली सोलापूर विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा

अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले की, शासनाने गणेशोत्सवाची नियमावली तयार केली आहे. त्यामध्ये गणपतीची स्थापना करण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्‍यक आहे. मंडप मर्यादित स्वरूपात उभारावेत, "श्रीं'चे आगमन व विसर्जनाची मिरवणूक काढता येणार नाही तसेच गणेशोत्सव काळात डॉल्बी, बॅंड, ढोल- ताशा, झांज पथक, लेझीम आदी वाद्य वाजविण्यास बंदी असणार आहे. सजावट भपकेबाजी नसावी. सार्वजनिक मूर्ती चार फुटांपर्यंत असावी. धार्मिक पूजाविधी, आरती, भजन, कीर्तन यांना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. मंडळांनी बाप्पांचे दर्शन लाईव्ह अथवा सोशल मीडियाद्वारे करण्यावर भर द्यावा. उत्सवात प्रबोधनात्मक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर किंवा तत्सम उपक्रम राबवावेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करावी. मंडपात निर्जुंतकीकरण, थर्मंल स्क्रीनिंगची व्यवस्था असावी, सोशल डिस्टन्स असावा, घरगुती गणपतींचे विसर्जन घरीच करण्यावर भर द्यावा, लहान मुले व वृद्धांनी विसर्जन स्थळी जाणे टाळावे.

हेही वाचा: चिमुकलीच्या 'त्या' उत्तराने समोर आले ऑनलाइन शिक्षणाचे वास्तव !

कोरोनाचा प्रसार वाढणार नाही याची सर्व मंडळांनी काळजी घ्यावी. सुरक्षितता राखावी, समाजोपयोगी उपक्रम राबवावेत तसेच प्रशासनास सहकार्य करावे. सूचनांचे पालन करूनच यंदाचा गणेशोत्सव साजरा करावा.

- अतुल झेंडे, अप्पर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत बसणारे गणपती (कंसात एक गाव-एक गणपती)

 • सोलापूर ता. : 783 (22)

 • मोहोळ : 111 (51)

 • मंद्रूप : 111 : (6)

 • कामती : 53 (2)

 • अक्कलकोट उ. : 94 : (20)

 • अक्कलकोट द. 104 : (38)

 • वळसंग : 97 (16)

 • बार्शी शहर : 24

 • बार्शी ता. : 35 (20)

 • वैराग : 51 (17)

 • माढा : 50 (10)

 • पांगरी : 26

 • करमाळा : 58 (3)

 • टेंभुर्णी : 20 (44)

 • कुर्डुवाडी : 75 (14)

 • पंढरपूर शहर : 150

 • पंढरपूर ता. : 140 (6)

 • पंढरपूर ग्रामीण : 49 (5)

 • करकंब : 35 (6)

 • मंगळवेढा : 221 (24)

 • अकलूज : 149 (10)

 • माळशिरस : 71 (0)

 • नातेपुते : 72 (10)

 • वेळापूर : 70 (6)

loading image
go to top