esakal | Solapur : मोहोळ तालुक्‍यात पुन्हा बिबट्या? हराळवाडीत पाडला श्वानाचा फडशा
sakal

बोलून बातमी शोधा

मोहोळ तालुक्‍यात पुन्हा बिबट्या? हराळवाडीत पाडला श्वानाचा फडशा

हराळवाडी (ता. मोहोळ) येथे मंगळवारी (ता. 5) मध्यरात्री गायरानात बिबट्यासदृश प्राण्याने श्वानावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला आहे.

मोहोळ तालुक्‍यात पुन्हा बिबट्या? हराळवाडीत पाडला श्वानाचा फडशा

sakal_logo
By
श्रावण तीर्थे

कोरवली (सोलापूर) : हराळवाडी (ता. मोहोळ) (Mohol Taluka) येथे मंगळवारी (ता. 5) मध्यरात्री हरी धोडमिसे या शेतकऱ्यांच्या शेताजवळील गायरानात बिबट्यासदृश (Leopard) प्राण्याने श्वानावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला आहे. याबाबत शेतकऱ्यांकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून, वनविभागाचे अधिकारी थोरात यांनी परिस्थितीची पाहणी केली.

हेही वाचा: सोलापूर जिल्हा दूध संघाचे प्रशासक पापळ यांची नियुक्ती रद्द

तेथे उमटलेल्या 'त्या' प्राण्यांच्या पायाचे ठसे घेऊन ठसे पुढील तपासणीसाठी पाठविले आहेत. प्रथमदर्शनी हे ठसे बिबट्यासदृश प्राण्याचे असल्याचे वनविभागाचे अधिकारी थोरात यांनी सांगितले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हराळवाडी शिवारात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने याच परिसरात बिबट्या लपून बसला असेल म्हणून कोणीही शेतकरी शेताकडे जाण्यास तयार नाहीत. बिबट्याचा वावर असलेल्या भागात वन विभागाकडे पिंजरा लावावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

जिवाची जोखीम घेऊन शेतामध्ये जाण्याची वेळ येऊ देण्याऐवजी वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे. वन विभागाकडून शेतकऱ्यांना स्वत:ची सुरक्षा करण्याचे तसेच जनावरांची सुरक्षा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपली जनावरे गोठ्यामध्ये बांधण्याचे तसेच शेतात जाताना किंवा येताना एकटे न जाता समूहाने जावे तसेच आवाज करत जाणे किंवा मोबाईलवर गाणे लावून जाणे तसेच बिबट्या दिसला तर त्याचा फोटो काढण्यासाठी त्याच्या पाठीमागे जाऊ नये, अशा सुरक्षेच्या सूचनाही वन विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: ओझेवाडी सोसायटीत बोगस कर्जवाटप! चौकशी अहवालातून धक्कादायक बाब उघड

गेल्या दीड महिन्यापूर्वी मोहोळ परिसरातील विविध ठिकाणी बिबट्या दिसल्याच्या व त्याने जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र नंतर तो बिबट्या कुठे गायब झाला ते कळलेच नाही. मंगळवारी करमाळा व नगरच्या दरम्यानच्या गावात बिबट्या दिसल्याचे त्या परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले होते. तो बिबट्या मोहोळ तालुक्‍यात आला असावा का, असा तर्क लढविला जात आहे.

loading image
go to top