मनसेचा एसटी आंदोलनाला पाठिंबा! विठ्ठलाला घातले साकडे | Pandharpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसेचा एसटी आंदोलनाला पाठिंबा! विठ्ठलाला घातले साकडे
मनसेचा एसटी आंदोलनाला पाठिंबा! विठ्ठलाला घातले साकडे

मनसेचा एसटी आंदोलनाला पाठिंबा! विठ्ठलाला घातले साकडे

sakal_logo
By
भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला (ST Strike) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) पाठिंबा दिला असून, आज (गुरुवारी) मनसे नेते दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठलाच्या प्रतिकात्मक प्रतिमेला दुग्धाभिषेक करून आघाडी सरकारला सुबुद्धी दे, असे साकडे घालण्यात आले. या वेळी मनसे पदाधिकारी व एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन केले.

मागील पंधरा दिवसांपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. संपाचा परिणाम एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. राज्य सरकारने तत्काळ संपावर तोडगा काढून प्रवासी वाहतूक सुरू करावी, यासाठी आज मनसेनेही पंढरपुरातील विठ्ठल मंदिरासमोरील नामदेव पायरीजवळ विठ्ठलाच्या प्रतिकात्मक मूर्तीला दुग्धाभिषेक घालून आंदोलन केले.

हेही वाचा: पंढरीच्या विठूरायाला अर्पण केलेले सोने मुंबईत वितळवणार!

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत 'बा विठ्ठला... राज्य सरकारला सुबुद्धी दे' असे साकडे या वेळी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी घातले. या वेळी मनसे पदाधिकारी व एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन केले. या वेळी कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुण कोळी, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, शशिकांत पाटील, सिद्धेश्वर गरड, संतोष कवडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

loading image
go to top