esakal | सांगोल्यात महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर भाजपचा उपनगराध्यक्ष! शेकापला धक्का | Political News
sakal

बोलून बातमी शोधा

Sangola
सांगोल्यात महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर भाजपचा उपनगराध्यक्ष! शेकापला धक्का

सांगोल्यात महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर भाजपचा उपनगराध्यक्ष!

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : सांगोला (Sangola) नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी अनपेक्षितपणे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पाठिंब्यावर भाजपचे (BJP) तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत (Chetansinh Kedar-Sawant) यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत शेकापला (Shetkari Kamgar Party) मात्र धक्का बसला आहे. गेल्या पाच वर्षात चेतनसिंह केदार-सावंत यांची दुसऱ्या वेळी उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे.

हेही वाचा: पवारांच्या गृहप्रवेशाने कोठेंचा पक्षप्रवेश! ठरली महापालिकेची रणनीती

उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदाची निवडणुक शुक्रवारी पार पडली. सकाळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्याकडे उपनगराध्यक्षपदासाठी भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षाकडून भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी अर्ज दाखल केला. आनंदा माने गट व शेकाप पक्षाकडून नगरसेवक गजानन बनकर यांचाही अर्ज दाखल करण्यात आला. एकापेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्याने दुपारी एकच्या सुमारास निवडणूक घेण्यात आली. सभागृहात प्रत्यक्ष मतदान हात वर करून घेण्यात आले.

या निवडणुकीमध्ये चेतनसिंह केदार यांच्या बाजूने 11 नगरसेवकांनी तर गजानन बनकर यांच्या बाजूने 10 नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. यामध्ये एका मताने चेतनसिंह केदार निवडून आल्याचे पीठासीन अधिकारी नगराध्यक्षा राणी माने यांनी जाहीर केले. चेतनसिंह केदार यांना स्वत: चेतनसिंह केदार यांच्यासह सचिन लोखंडे, जुबेर मुजावर, सतीश सावंत, भामाबाई जाधव, पूजा पाटील, सुनीता खडतरे, अनुराधा खडतरे, रंजना बनसोडे, शोभा घोंगडे, स्वाती मस्के यांनी तर गजानन बनकर यांच्यासह नगराध्यक्षा राणी माने, आनंदा माने, प्रशांत धनवजीर, अस्मिर तांबोळी, अप्सर ठोकळे, छायाताई मेटकरी, सुरेश माळी, रफिक तांबोळी, स्वाती मगर यांनी मतदान केले. पीठासीन अधिकारी नगराध्यक्षा राणी माने यांनी चेतनसिंह केदार यांना प्रतिस्पर्धी उमेदवार गजानन बनकर यांच्यापेक्षा जास्त मत पडल्याने चेतनसिंह केदार यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. निवडीनंतर चेतनसिंह केदार यांचा राष्ट्रवादी कार्यालयात सत्कार करण्यात आला. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्‍यांची आतषबाजी केली.

हेही वाचा: NCPचा कॉंग्रेसला धक्‍का! माजी महापौर, माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादीत

वेगळ्या राजकीय समीकरणांची नांदी?

शेकापला उपनगराध्यक्ष निवडणुकीत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने या निवडणुकीत भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांना पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय झाला. आगामी येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीने भाजपला दिलेली साथ वेगळ्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना? अशी चर्चा सध्या शहरात सुरू झाली आहे.

loading image
go to top