आमदार पडळकरांच्या गाडीवर दगडफेक !पवारांवरील टीकेतून घटनेचा संशय

आमदार पडळकरांच्या गाडीवर दगडफेक ! शरद पवारांवरील टीकेचा राग
MLA Padalkar
MLA PadalkarCanva

आमदार पडळकर हे मड्डी वस्ती परिसरातून शासकीय विश्रामगृहाकडे जात असताना मागून येणाऱ्या दुचाकीवरील एका तरुणाने त्यांच्या गाडीवर दगड मारला. तो दगड गाडी आणि काच यांच्या मध्यभागी लागला.

सोलापूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी आज (बुधवारी) सकाळी टीका केली होती. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध अनेकांनी सोशल मीडियातून राग व्यक्‍त केला. ओबीसी आरक्षण (OBC reservation) रद्द झाल्यावरून आमदार पडळकर हे घोंगडी बैठकीसाठी सोलापुरात आले होते. रात्री आठच्या सुमारास ते जोडभावी पेठ पोलिस ठाणे परिसरातील मड्डी वस्तीतील एसबीआय कॉलनीसमोरून जाताना एकाने त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, त्या व्यक्‍तीचा शोध घेतला जात आहे. (In Solapur, a stone was hurled at MLA Padalkar's car)

MLA Padalkar
विठुरायाच्या सुंदर पोशाखांनी गावागावातील विठ्ठल मूर्ती सजणार

कॉंग्रेसच्या "एकला चलो रे'च्या भूमिकेवरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अन्य काही नेत्यांनी तिसऱ्या आघाडीसाठी दिल्लीतील काही नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा असल्याबद्दल पत्रकारांनी पडळकरांना विचारले. त्यावर पडळकरांनी "रात्र गेली हिशेबात अन्‌ पोरगं नाही नशिबात' अशी टीका केली. तसेच शरद पवार हे भावी पंतप्रधान असे मी लहानपणापासून ऐकत आलो असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. शरद पवार यांना मी मोठे मानत नसून राष्ट्रवादी ही साडेतीन जिल्ह्यांपुरतीची पार्टी आहे, अशीही टीका त्यांनी या वेळी केली होती. त्याचा राग मनात ठेवून दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या तरुणाने पडळकरांच्या गाडीवर दगड फेकला, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर आमदार पडळकर हे सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाले. त्या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी "एकच छंद गोपीचंद', "भारतीय जनता पार्टीचा विजय असो' अशी घोषणाबाजी केली.

MLA Padalkar
आळंदीच्या माऊलीला पंढरीत लुटले

सीसीटीद्वारे त्या दुचाकीस्वारांचा शोध

आमदार पडळकर हे मड्डी वस्ती परिसरातून शासकीय विश्रामगृहाकडे जात असताना मागून येणाऱ्या दुचाकीवरील एका तरुणाने त्यांच्या गाडीवर दगड मारला. तो दगड गाडी आणि काच यांच्या मध्यभागी लागला. जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब भालचिम हे त्यांच्या टीमसह घटनास्थळीच आहेत. पोलिसांनी आता परिसरातील सीसीटीव्हीद्वारे त्या दुचाकीस्वारांचा शोध सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com