विठुरायाच्या सुंदर पोशाखांनी गावागावातील विठ्ठल मूर्ती सजणार

विठुरायाच्या सुंदर पोशाखांनी गावागावातील विठ्ठल मूर्ती सजणार
Summary

या निर्णयामुळे गावागावातील विठ्ठल मूर्तीचे रुपडे अधिक खुलून दिसणार आहे.

पंढरपूर (सोलापूर) : विठुरायाचे सावळे, गोजिरे रूप भक्तांना नेहमीच भावते. त्यात अधिक भर पडते ते विठुरायाला परिधान केलेल्या भरजरी वस्त्रांच्या पोशाखाची. उंची वस्त्राच्या पोशाखामुळे देवाचे सुंदर रुप अधिकच खुलून दिसते. देवाला दैनंदिन परिधान केले जाणारे पोशाख हे भाविकांकडून मंदिर समितीला दान स्वरुपात दिले जातात. देवाचे असे अनेक पोशाख मंदिर समितीकडे वापरा विना शिल्लक आहेत. असे चांगले पोशाख आता गावगाड्य़ातील विठ्ठल मूर्तींना मोफत भेट देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. या निर्णयामुळे गावागावातील विठ्ठल मूर्तीचे रुपडे अधिक खुलून दिसणार आहे. (the clothes of vitthal of pandharpur will now be given free of cost to the idols of vitthal in the village)

विठुरायाच्या सुंदर पोशाखांनी गावागावातील विठ्ठल मूर्ती सजणार
पंढरपूर पायी वारीसाठी वारकरी करणार प्रयत्न

अलीकडच्या काही वर्षापासून विठुरायाला पोशाख दान करणाऱ्या भाविकांची संख्या अधिक वाढली आहे. त्यामुळे देवाला दररोज नवीन पोषाख परिधान केला जातो. मागील काही वर्षापासून देवाचे असे भरजरी वस्त्रांचे हजारो पोषाख मंदिरात‌‌ शिल्लक आहेत. जास्त दिवस पोषाख तसेच ठेवले तर ते वापराविना कायमचे खराब होण्याची शक्यता आहे. हीच शक्यता गृहीत धरुन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी गावोगावी असलेल्या विठ्ठल मूर्तींना देवाचे पोषाख मोफत भेट देण्याची कल्पना पुढे आणली आहे. त्यानुसार मंदिर समितीकडे उपलब्ध असलेले सुमारे दोन हजार विठुरायाचे पोषाख मोफत भेट दिले जाणार आहेत.

विठुरायाच्या सुंदर पोशाखांनी गावागावातील विठ्ठल मूर्ती सजणार
आशादायक ! पंढरपूर तालुक्‍यातील 11 गावे झाली कोरोनामुक्त

आषाढी यात्रेनंतर पोषाखांचे वाटप केले जाणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी मंदिर समितीकडे नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. आषाढी कार्तिकी सह प्रमुख चार यात्रा, विविध सण आणि समारंभाच्या निमित्ताने विठ्ठल आणि रुक्मिणीला अंगी, धोतर, कद, उपरणे, फेटा असा आकर्षक भरजरी वस्त्रांचा पोशाख परिधान केला जातो. त्यावर सोन्याचे अलंकार परिधान करून भाळी चंदनाचा टिळा लावला जातो. देवाचे हे नटलेले रुप पाहण्यासाठी भाविक अतूर असतात.

विठुरायाच्या सुंदर पोशाखांनी गावागावातील विठ्ठल मूर्ती सजणार
यंदाही पायी वारी आणि विठ्ठल दर्शन नाहीच - अजित पवार

देवाला दररोज सायंकाळी चार वाजता नवीन पोशाख परिधान करुन देवाचे नित्योपचार केले जातात. रुक्मिणी मातेलाही भाविक नववारी साडी आणि चोळी अर्पण करतात. लाॅकडाऊन असले तरी पोशाखाचे दान सुरुच आहे. रुक्मिणी मातेला अर्पण केलेल्या साड्यांची मंदिर समितीकडून विक्री केली जाते. परंतु विठुरायाचे पोशाख तसेच मंदिरात ठेवले जातात. देवाचे हजारो पोशाख मंदिर समितीकडे सुस्थित आहेत. असे पोशाख ग्रामीण भागातील विठ्ठल मूर्तीला परिधान करण्यासाठी भेट म्हणून देण्यात येणार आहेत. मंदिर समितीच्या पोशाख भेट देण्याच्या या स्तुत्य उपक्रमाचे भाविकांकडून स्वागत केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com