Solapur News: जुळ्या बहिणींशी संसार थाटणाऱ्या नवरदेवाला न्यायालयाचा दिलासा

दोन लग्न करुनही सोलापूरच्या तरुणाला मिळाला दिलासा
Solapur News
Solapur NewsEsakal

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे एकाच मांडवात दोन जुळ्या बहिणींशी लग्न केलेल्या नवरदेवाला मोठा दिलासा मिळाला आहे. नवरदेव अतुल अवताडे यांच्याविरोधात अकलूज पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला पाठवून द्यावा असा आदेश दिला होता. मात्र, आता न्यायालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार अतुल अववताडेला मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, अकलूज माळेवाडी येथील राहुल फुले यांनी याबाबतची तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली होती. दरम्यान, न्यायालयाकडून पोलिसांना या दाम्पत्याची चौकशीची करण्यासाठीची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे पोलीस तपासाचा मार्ग बंद झाला आहे. याविषयी अकलूज डीवायएसपी शिवपूजे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

एकत्र लग्न झाल्यामुळे पत्नीच्या विरोधाचा प्रश्नच नाही त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही. जोपर्यंत पहिला जोडीदार तक्रार देत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल होऊ शकत नाही. त्यामुळे, या लग्नाची कायदेशीर नोंद होत आहे. दुसरं लग्न हे वैध ठरत नाही. त्यामुळे या नवदेवला दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा : Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

काय आहे प्रकरण?

मुंबईतील कांदिवली येथील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणींनी माळशिरस तालुक्यातील अतुल बरोबर लग्न केलं आहे. पिंकी आणि रिंकी या दोघी जुळ्या बहिणी आहेत. त्यांना लहाणपणापासून एकमेकींची फार सवय आहे. त्या दोघी एकमेकीपासून लांब राहू शकत नसल्यामुळे त्यांनी एकाच मुलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Solapur News
Solapur News: '...म्हणून जुळ्या बहिणींनी केलं एकाच मुलाशी लग्न'

पिंकी आणि रिंकी या दोघी जुळ्या बहिणींच्या वडिलांचे निधन झाले आहे. काही महिन्यांपूर्वी पिंकी, रिंकी आणि त्यांची आई या तीघी आजारी होत्या. अतुलने त्याच्या टॅक्सीतून त्यांना रुग्णालयात नेले. त्यांची त्याने काळजी घेतली. त्यांनी घेतलेली काळजी आणि दाखवलेला आपलेपणा यामुळे पिंकीला अतुल आवडू लागला. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु या दोघी कधीच वेगळ्या राहिल्या नव्हत्या त्यामुळे आईच्या आणि अतुल याच्या कुटुंबीयांच्या संमतीने दोघींनीही अतुल याच्यासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला.

रिंकी आणि पिंकी या दोघीही इंजिनियर असून त्या जुळ्या बहिणी आहेत. या दोघींचे शिक्षणही एकत्रित झाले आहे. त्यानंतर एकाच आयटी कंपनीत नोकरीला देखील लागल्या आहेत. दोघींनाही एकमेकींची एवढी सवय झाली की त्यांनी एकाच वरास जीवनसाथी म्हणून निवड करून त्याच्यासोबत लग्न केले आहे. या अनोख्या विवाहाच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत.

Solapur News
Solapur News: दोन जुळ्या बहिणींशी लग्न करणं नवरदेवाला पडणार महागात? महिला आयोगाचे कारवाईचे आदेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com