Solapur Bazar Samiti: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बहुतेक निवडणुका बिनविरोधच

मोहिते- पाटील परिवाराची एकहाती आणि निर्विवाद सत्ता
Solapur Bazar Samiti Election
Solapur Bazar Samiti ElectionEsakal

Solapur Bazar Samiti Election: पश्चिम महाराष्ट्राची आर्थिक घोडदौड आणि चोहोबाजूनी विकास हा फक्त सहकारातून झाला आहे हे निर्विवाद सत्य आहे.

सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते- पाटील यांनी २ मार्च १९५० रोजी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली. स्थापनेपासून या संस्थेवर मोहिते- पाटील परिवाराची एकहाती आणि निर्विवाद सत्ता आहे. बहुतेक निवडणुका या बिनविरोधच झालेल्या आहेत.(Latest Marathi News)

बाजार समितीवर सभापती म्हणून स. म. कै. शंकरराव मोहिते-पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते- पाटील, फत्तेसिंह माने- पाटील, मदनसिंह मोहिते- पाटील आदींनी कामकाज पाहिले आहे.

या संस्थेअंतर्गत अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती, नातेपुते उपबाजार समिती आणि माळशिरस येथे कामकाज सुरू आहे. पिलीव, शिंदेवाडी या ठिकाणी जागा घेऊन ठेवलेली आहे. प्रत्यक्षात मात्र नातेपुते आणि अकलूज येथे कारभार अतिशय चांगला व नियमित सुरू आहे.(Marathi Tajya Batmya)

Solapur Bazar Samiti Election
Ajit Pawar: 'अधिवेशनाच्या वेळी 18 दिवस आम्ही तेच सांगत होतो'

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीत व नातेपुते येथील मार्केट कमिटीत यापूर्वी गूळ, कापूस, भुईमुगाची शेंगा, बाजरी, गहू, मका, ज्वारी यांची आवक मोठ्या प्रमाणात होत होती. या बाजारपेठेतून राज्यात व परराज्यात तसेच अनेकदा परदेशातही शेतीमालाची निर्यात होत होती.

परंतु दिवसेंदिवस शेतकऱ्यांची शेती करण्याची पद्धत बदलली आणि ही भुसार पिके शेतकरी उत्पादन करण्याचे थांबवू लागल्यामुळे या मालाची सध्या आवक बंद झालेली आहे. जी होती तीही अल्प प्रमाणात होत आहे.

सध्या अकलूज येथे डाळिंब आणि केळी, भाजीपाला व कांद्याची मोठी आवक आहे. तसेच अकलूज व नातेपुतेचा जनावरांचा व शेळ्या- मेंढ्यांचा बाजार प्रसिद्ध आहे. मात्र खरे उत्पन्न हे दोन्ही मार्केट कमिटींना ४०० व्यापारी गाळ्यांतूनच होत आहे.

तो सध्या उत्पन्नाचा मोठा मार्ग दिसून येतो. सध्या विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची घोडदौड शासकीय निकषानुसार वेगात सुरू आहे. जिल्ह्यात प्रथम क्रमांक या मार्केट कमिटीचा आहे.

Solapur Bazar Samiti Election
Salman Khan News : सलमान खानला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा! नेमकं काय आहे प्रकरण?

डाळिंब मार्केट मोठे उभारलेले आहे. राज्यातील एकमेव उदाहरण येथे आहे की, जेथे हमीभाव केंद्रे सुरू केली जातात. सध्या अकलूज येथे पेट्रोल पंप सुरू आहे. तेथे लवकरच सीएनजी पंप सुरू होणार आहे. माळशिरस, नातेपुते, पिलीव येथे पेट्रोल पंप व सीएनजी पंप उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. भविष्यात अकलूज येथे भव्य कांदा मार्केट उभारले जाणार आहे. अकलूज व नातेपुते येथे कोल्ड स्टोअरेजचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.

मागील दोन निवडणुकीत उत्तमराव जानकर, माजी आमदार रामहरी रूपनवर, राजकुमार पाटील, प्रकाशबापू पाटील, डॉ. रामदास देशमुख, के. के. पाटील, सोपानराव नारनवर, सुभाष पाटील आदींनी विरोधात एकत्र येऊन दोन वेळा १८ पैकी १८ जागा लढविल्या होत्या.

यापूर्वीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदारसंघातून उत्तमराव जानकर यांच्या पत्नी विमल जानकर यांचा फक्त चार मतांनी निसटता पराभव झाला होता. परंतु, यंदाच्या निवडणुकीत मोहिते-पाटील विरोधकांमध्ये एकी दिसत नाही.

बहुतेक विरोधक हे भाजपवासी झालेले आहेत. एकटे उत्तमराव जानकर हे आपल्या एकट्याच्या नेतृत्वाखाली १८ पैकी १८ जागा लढवू शकत नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे होणाऱ्या निवडणुकीत १८ संचालकांची सत्ताधारी मोहिते-पाटील गटाने निवड केल्याचे खात्रीलायक समजते व त्यांचा उमेदवारी अर्ज दोन दिवसांत भरणार असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com