सोलापूर : जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचारात मोठी वाढ

हुंडा अन्‌ पैशासाठी दोन हजार विवाहितांचा छळ; चार भिंतीतील भांडण पोलिस ठाण्यात
Domestic violance
Domestic violancesakal

सोलापूर - अनेकांच्या सुखी संसाराला कोरोनाची नजर लागली आणि पती-पत्नीत कौटुंबिक कलह निर्माण झाले. बहुतेक भांडणात पैसा हेच कारण आहे. तसेच पती-पत्नीच्या संसारात माहेरच्यांची लुडबूड आणि सासू- सासऱ्यांचा वाढलेला हस्तक्षेप, मोबाइलचा अतिवापर आणि चारित्र्यावरील संशयातूनही अनेक भांडणे झाली. अडीच वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार १२ विवाहितांनी पतीसह सासरच्या त्रासाला कंटाळून पोलिस ठाणे गाठले आहे. हुंडा मागणे किंवा घेणे कायद्याने गुन्हा असून ही प्रथा खूप वर्षांपूर्वीच बंद झाली आहे. तरीही, सासरच्यांकडून विवाहितेचा हुंड्यासाठी छळ केला जातोय, अशी स्थिती सोलापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आहे.

कोरोनातील निर्बंधांमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांचे जगणे मुश्कील झाले. अनेकांनी पत्नीच्या माहेरी डोळा ठेवला आणि माहेरून पैसे आण म्हणून पत्नीचा छळ सुरू केला. दुसरीकडे, काही प्रकरणांत अनेकांनी पत्नीच्या चारित्र्यावरही संशय घेतला. तसेच लग्नात हुंडा दिला नाही, मानपान केला नाही, महागड्या वस्तू दिल्या नाहीत, दुकान टाकायचे आहे, जागा किंवा घर घ्यायचे आहे, माहेरून पैसे आण म्हणूनही अनेकांनी विवाहितेचा छळ केला, अशीही उदाहरणे आहेत. तर काही प्रकरणांत सुनेने सासू- सासऱ्यांना त्रास दिल्याचेही गुन्हे आहेत. २०२० पेक्षाही २०२१ मध्ये कौटुंबिक हिसांचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. तर अनेक महिला, पुरुष घर सोडून बेपत्ताही झाले आहेत. कौटुंबिक वाद वाढू नयेत म्हणून पोलिसांनी प्रयत्न केला. त्यांचे समुपदेशन करण्यासाठी एक कायेदतज्ज्ञ, एक मानसोपचारतज्ज्ञ अशा व्यक्तीही पोलिसांनी मदतीला घेतल्या. महिला सुरक्षा कक्षाच्या माध्यमातून अनेकांचे वाद मिटलेही. पण, कोरोना काळातील अनेक अडचणींमुळे तक्रारदारांचे समुपदेशन करता आले नाही. अडीच वर्षांत जवळपास अडीचशे पत्नी-पत्नींचा वाद न्यायालयापर्यंत पोचला आहे.

विवाहितेला मिळेना ‘शक्ती’

कौटुंबिक हिंसाचारासह अत्याचारग्रस्त महिलांना न्याय मिळावा, या हेतूने मागील अधिवेशनात राज्य सरकारने शक्ती कायदा केला. दुसरीकडे प्रत्येक पोलिस आयुक्तालय व पोलिस अधीक्षक कार्यालयात महिलांच्या तक्रारी मिटविण्यासाठी भरोसा सेलही उभारण्यात आला आहे. त्या ठिकाणी विवाहितेचा छळ करणाऱ्यांना समज देऊनही पुन्हा पती-पत्नीच्या वादातून महिलेचा छळ केला जातोय, असे चित्र आहे. त्यामुळे पती-पत्नीतील वाद मिटविताना पोलिस कर्मचाऱ्यांबरोबरच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही लक्ष देणे गरजेचे आहे.

कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे (२०२० ते मार्च २०२२)

(ग्रामीणमधील स्थिती)

एकूण तक्रारी : ६०३ आपापसातील समझोता : ३४०

न्यायालयात दाखल खटले : ११९ गुन्हे दाखल : ७४

प्रलंबित प्रकरणे : ७०

(शहरातील स्थिती)

एकूण तक्रारी : १,४०९ आपापसातील समझोता : १,०९७

न्यायालयात दाखल खटले : १३९ गुन्हे दाखल : ९४

प्रलंबित प्रकरणे : ७९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com